शिवपूर्वकालीन भारत

महाराणा प्रताप

views

5:9
महाराणा प्रताप: महाराणा प्रतापसिंह यांच्या वडिलांचे नाव महाराणा उदयसिंह आणि त्यांच्या आईचे नाव महाराणी जयवंताबाई असे होते. महाराणा प्रतापसिंह यांचा जन्म ९ मे इ.स.१५४० या दिवशी कुंभलगड येथे झाला होता. वडिलांच्या मृत्यूनंतर राजस्थानातील मेवाडच्या गादीवर महाराणा प्रताप आले. संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अमलाखाली आणण्याचा अकबराचा उददेश होता. महाराणा प्रतापांनी मेवाडच्या अस्तित्वासाठी अकबराशी अखेरपर्यत संघर्ष केला.1576 मध्ये हल्दीघाटीमध्ये महाराणा प्रताप आणि अकबरामध्ये युद्ध झाले. महाराणा प्रताप यांनी अत्यंत शक्तीशाली अशा मोगल बादशाह अकबराच्या 85000 सैनिकांच्या विशाल सैन्याशी आपल्या केवळ 20000 सैनिक आणि तोकड्या शस्त्रास्त्रांच्या आधारे अनेक वर्षे संघर्ष केला. सलग 30 वर्षांच्या प्रयत्नांनंतरही अकबराला महाराणा प्रताप यांना बंदी बनवता आले नाही. एवढेच नाही तर, महाराणा प्रताप यांच्या मृत्यूची बातमी ऐकून अकबरही रडला होता. भारतीय इतिहासात महाराणा प्रतापसिंहाचे नाव नेहमीच साहस, शौर्य, त्याग आणि स्वाभिमान यासाठी प्रेरणादायक ठरलेले आहे. आणि या सर्व गुणांसाठी महाराणा प्रताप इतिहासात अजरामर झाले आहेत.