गुणोत्तर - प्रमाण Go Back कोष्टक पूर्ण करू views 3:20 मुलांनो चला आपण आता हे दिलेले कोष्टक पूर्ण करू. ___________________________ मुली 3 5 - 1 __________________________ फुले 12 - 32 - ___________________________ पहा, या कोष्टकात एकूण मुलींची आणि फुलांची संख्या दिली आहे. आणि सांगितले आहे की प्रत्येक मुलीला सारख्याच प्रमाणात फुले वाटली आहेत. तर आपल्याला या सर्वांचे गुणोत्तर प्रमाण काढायचे आहे. शि: पहिल्या उदाहरणात 3 मुली आणि 12 फुले आहेत. म्हणजे यांचे प्रमाण झाले 3: 12. म्हणजेच 3/12 =1/4. म्हणून प्रत्येक मुलीला 4 फुले मिळाली. शि: आता दुसऱ्या उदाहरणात मुली आहेत 5 आणि प्रत्येकीला जर 4 फुले वाटली तर एकूण किती फुले असायला हवीत? वि: सर 20. शि: अगदी बरोबर ! म्हणून यांचे प्रमाण असेल 5:20 म्हणजेच ¼. शि: आता पुढचे उदाहरण तुम्ही सोडवा? वि: सर इथे फुले दिली आहेत 32. पण यात आपल्याला एकूण किती मुलींनी फुले वाटली ते काढायचे आहे. जर 32 फुले प्रत्येक मुलीला 4 प्रमाणे वाटली तर आठ चोक 32 होतात. म्हणजे इथे 8 मुली असतील. आणि यांचे प्रमाण असेल 8:32 = 8/32 म्हणजेच ¼. शि: बरोबर आता शेवटचे उदाहरण. वि: सर इथे एकच मुलगी आहे. आणि तिला जर आपण 4 फुले दिली तर त्याचे प्रमाण 1:4 असे होईल आणि ते आपण ¼ अशा प्रकारे गुणोत्तर स्वरूपात लिहू. शि: अगदी बरोबर ! प्रस्तावना कोष्टक पूर्ण करू गुणोत्तरासंबंधी महत्त्वाच्या बाबी शाब्दिक उदाहरणे एकमान पद्धत