गुणोत्तर - प्रमाण

शाब्दिक उदाहरणे

views

2:34
आता आपण थोडेसे वेगळे गणित सोडवू. : समजा, एका गावामध्ये शाळेतील मुलींसाठी होस्टेल बांधायचे आहे. या होस्टेलमध्ये दर 15 मुलींसाठी दोन शौचालय हवी असतील. आणि या होस्टेलमध्ये जर 75 मुली राहणार असतील तर मुलींच्या प्रमाणात किती शौचालये बांधावी लागतील? शि: पहा, प्रथम आपण शौचालये व मुलींचे प्रमाण म्हणजेच गुणोत्तर पाहू. याठिकाणी मुलींची संख्या दिली आहे 75. पण शौचालयाची एकूण संख्या दिली नाही. म्हणून आपण मुलींसाठीच्या शौचालयांची संख्या x आहे असे मानू. तसेच प्रत्येकी मुलींची संख्या आणि शौचालयांची संख्या यांचे प्रमाण आहे 2:15 म्हणजेच 2/15. आता आपण समीकरण लिहू. x /75 = 2/15. आता x ची किंमत काढण्यासाठी दोन्ही बाजूंना 75 ने गुणले तर : x /75 × 75 = 2/151 × 755 . म्हणून x = 2×5. x = 10 म्हणून 75 मुलींसाठी एकूण 10 शौचालये बांधावी लागतील. तर मुलांनो अशाप्रकारे गुणोत्तराचा उपयोग करून समीकरण मांडता येते. त्यामुळे उदाहरण सोडवणे सोपे जाते.