गुणोत्तर - प्रमाण

गुणोत्तरासंबंधी महत्त्वाच्या बाबी

views

4:12
गुणोत्तरासंबंधी महत्त्वाच्या बाबी .: मुलांनो, आपण सुरवातीलाच पाहिले आहे की एकाच प्रकारच्या दोन राशींची तुलना करण्यासाठी त्या दोन्ही राशींचे एकक समान असणे आवश्यक असते. कसे ते पहा. या उदाहरणातून तुम्हाला ते स्पष्ट होईल. शि: समजा गुळाची लहान ढेप 1 किग्रॅ वजनाची आहे. आणि गुळाच्या खडयाचे वजन 200 ग्रॅम आहे. तर गुळाच्या खडयाच्या वजनाचे गुळाच्या ढेपेच्या वजनाशी गुणोत्तर काढा. या उदाहरणात दोन्ही परिमाणे वेगवेगळी आहेत. म्हणजेच गुळाच्या ढेपेचे वजन किलोग्रॅम मध्ये दिले आहे. तर गुळाच्या खडयाचे वजन ग्रॅममध्ये दिले आहे. जर ही दोन्ही एकके आपण समान न करता जर त्याचे प्रमाण लिहिले तर ते 200:1 म्हणजेच 200/1 असे असेल. याचा अर्थ असा होतो की गुळाच्या खडयाचे वजन 200 आणि ढेपेचे वजन 1 आहे. हे चुकीचे आहे. कारण गुळाची ढेप ही गुळाच्या खडयापेक्षा निश्चितच मोठी असते. म्हणजे गुळाच्या ढेपेचे वजन जास्त असायला हवे. म्हणूनच खरे प्रमाण काढण्यासाठी आपल्याला दोन्ही एकके समान करावी लागतील. म्हणजेच 1 किलोग्रॅमचे ग्रॅममध्ये रूपांतर करावे लागेल. 1 किलोग्रॅम म्हणजेच 1000 ग्रॅम. आपल्याला गुळाच्या खडयाच्या वजनाचे गुळाच्या ढेपेच्या वजनाशी गुणोत्तर काढायचे आहे. म्हणून आपले प्रमाण घ्यावे लागेल 200:1000 म्हणजेच 200/1000. याला भाग दिला असता 1/5 येईल. म्हणून गुळाच्या खडयाच्या वजनाचे गुळाच्या ढेपेच्या वजनाशी प्रमाण आहे 1:5 म्हणजेच गुणोत्तर आहे. 1/5.