नफा – तोटा

उदाहरणे सोडवू

views

3:38
नफा- तोट्यावर आधारित आणखी काही उदाहरणे सोडवू. उदाहरण 1) शाळेमध्ये फूड फेस्टिवल आयोजित केले होते. त्या फेस्टिवलमध्ये सरिताने भेळपुरीचा स्टॉल लावला होता. . तिने भेळपुरीच्या स्टॉलसाठी प्लेट 20 रु, चमचे 10रू., चटणी 30रू., मुरमुरे 50 रू., कांदे 20रू. आणि इतर साहित्य 60रू., असे एकूण 190 रुपयांचे साहित्य घेतले. विक्री करून सरिताला मिळालेली रक्कम 230 रुपये झाली. मग या व्यवहारात तिला नफा झाला की तोटा? शि: पहा, सरिताने भेळ स्टॉलसाठी एकूण 190रुपये खर्च केला आहे. आणि तिला विक्री करून मिळालेली एकूण रक्कम आहे 230रुपये. म्हणजे याठिकाणी विक्रीची किंमत ही खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त आहे. म्हणजेच नफा झाला आहे. म्हणून नफा = विक्री किंमत – खरेदी किंमत = रु 230-190 = 40रू. म्हणून सरिताला भेळपुरीच्या स्टॉलमध्ये 40 रू. नफा झाला