नफा – तोटा

एकूण खरेदी व नफा-तोटा

views

3:52
एकूण खरेदी व नफा-तोटा शि: मुलांनो तुम्हाला नफा तोटा म्हणजे काय आणि तो कसा काढायचा हे समजले आहे. आता आपण एकूण खरेदी व नफा- तोटा म्हणजे काय ते समजून घेऊ. खरेदी विक्रीचा व्यवहार करताना एखादी वस्तू विकण्यापूर्वी जो खर्च करावा लागतो तो सर्व खर्च खरेदी किमतीमध्ये मिळवावा लागतो. त्या खरेदी किमतीलाच आपण एकूण खरेदी किंमत असे म्हणतो उदा :- समजा, तुम्ही 1 क्विंटल गहू बाजारातून 2000 रुपयांना विकत घेतला. हा गहू घरी आणण्यासाठी तुम्हाला हमालाला 20 रुपये मजुरी द्यावी लागली. आणि यावरील वाहतुकीचा खर्च 50 रु झाला. तर गव्हाची एकूण खरेदी किंमत असेल: एकूण खरेदी किमंत 2000 रू. + हमाली 20रू, + वाहतूक खर्च 50 रू. = एकून खर्च रू. 2070. म्हणून गव्हाची एकूण खरेदी किंमत = 2070रू. या किमतीलाच गव्हाची एकूण खरेदी किंमत असे म्हणतात.