नफा – तोटा

सरावासाठी उदाहरणे

views

4:12
आता आपण सरावासाठी आणखी काही एकूण खरेदी आणि नफा तोट्याची उदाहरणे सोडवू. उदाहरण 1) अजयने 1400 रुपयांना एक याप्रमाणे 160 मिक्सर खरेदी केले. त्यासाठी त्याला रु 2560 वाहतुकीवर खर्च करावा लागला . जर त्याला एकूण रु 36000 नफा हवा असेल तर त्याने प्रत्येकी मिक्सर कितीला विकावा? शि: मुलांनो, या उदाहरणामध्ये १ मिक्सरची किंमत 1400 रुपये दिली आहे. असे अजयने 160 मिक्सर खरेदी केले आहेत. म्हणून आपल्याला 160 मिक्सरची खरेदी किंमत काढावी लागेल. 160 मिक्सरची खरेदी किंमत = 1400 x 160 = 2,24,000 रुपये. आता आपल्याला मिक्सरची एकूण खरेदी किंमत काढावी लागेल. एकूण खरेदी किंमत = खरेदी + वाहतूक खर्च = 224000 + 2560 = 2,26,560 म्हणून एकूण खरेदी किंमत आहे 2,26,560. रुपये. जर अजयला रु 36,000 नफा हवा आहे तर त्याला सर्व मिक्सर 2,26,560 + 36,000= 2,62,560 रुपयांना विकावे लागतील. याचाच अर्थ 160 मिक्सर 2,62,560 रुपयांना विकावे लागतील. म्हणून मग आता आपल्याला एका मिक्सरची किंमत काढावी लागेल. म्हणून 1 मिक्सरची किंमत =262560 ÷ 160 = 1641रू. म्हणून अजयला एक मिक्सर 1641 रुपयांना विकावा लागेल