नफा – तोटा

उदाहरणे सोडवू

views

4:08
शेकडा नफा व शेकडा तोटा यावर आधारित आणखी काही उदाहरणे आपण सोडवूया: शर्टावर झालेला नफा = विक्री किंमत–खरेदी किंमत = 250 – 200= 50 रुपये. म्हणून शर्टावर 50 रू.नफा झाला आता शर्टावरील नफा आपण Ya % मानू. म्हणून आपले समीकरण असे झाले a/100 = 50/200 a ची किंमत काढण्यासाठी दोन्ही बाजूंना 100 ने गुणू. म्हणून a/100 × 100 = 50/200 × 100 a = 50/2 = 25 a = 25. म्हणून शर्टच्या व्यवहारात 25 % नफा झाला. आता पहा पँटीच्या व्यवहारात 12 % नफा आणि शर्टच्या व्यवहारात 25 % नफा झाला आहे. यातील शर्टच्या व्यवहारातील नफा जास्त आहे. म्हणून शर्टाचा व्यवहार अधिक फायदेशीर ठरला. उदाहरण 2) अमितने 60 आंबे 480 रुपयांना खरेदी केले. ते आंबे त्याने 10 रुपयाला 1 या प्रमाणे विकले तर त्याला नफा झाला की तोटा ? आणि किती टक्के झाला? शि: पहा, अमितने 60 आंबे खरेदी केले आहेत 480 रुपयाला .म्हणजेच त्याच्या आंब्यांची खरेदी किंमत आहे रु 480. आणि त्याने 10 रुपयाला 1 या प्रमाणे 60 आब्यांची विक्री केली आहे. म्हणून त्याची विक्री किंमत आहे 10 x 60 = 600 रुपये. आंब्यांची विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे. म्हणून या ठिकाणी त्याला नफा झाला आहे . हा नफा किती आहे ते पहा. नफा = विक्री किंमत–खरेदी किंमत = 600- 480 = 120रुपये. म्हणून त्याला नफा 120रु झाला . आता आपण हा नफा किती टक्के आहे ते काढू. प्रथम शेकडा नफा x % मानू. म्हणून आपले समीकरण होईल: x /100 = 120/600 आता x ची किंमत काढण्यासाठी दोन्ही बाजूंना 100 ने गुणू. म्हणून x /100 × 100 = 120/600 × 100 x = 120/6 x = 20 म्हणजेच अमितला 20 % नफा झाला.