स्वराज्य स्थापना

वीरमाता जिजाबाई

views

2:37
वीरमाता जिजाबाई :- जिजाबाई या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील मातब्बर सरदार लखुजीराजे जाधव यांच्या कन्या होत्या. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई होते. कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही व मोगलांच्या सततच्या आक्रमणांमुळे पुणे परगण्याची अवस्था अतिशय खराब झाली होती. अशा परीस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्यासोबत अतिशय मन लावून पुण्याचा विकास घडवून आणला. त्यांना लहानपणीच विविध विद्यांबरोबर लष्करी शिक्षणही मिळाले होते. म्हणजेच, त्यांचा युद्धात वापरल्या जाणाऱ्या नीतींचा, तंत्रांचा चांगला अभ्यास होता. म्हणूनच शहाजीराजे बंगळुरात असताना तसेच शिवाजीराजे आग्र्याच्या कैदेत असताना जिजाबाईंनी स्वराज्याची जबाबदारी निभावून नेली. शहाजी महाराजांनी पाहिलेले स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, म्हणून जिजाबाई शिवबांना प्रोत्साहन देऊन साहाय्य करत असत. त्या कर्तृत्ववान आणि दृष्ट्या राजनीतिज्ञ होत्या. वेळप्रसंगी प्रजेचे प्रश्न सोडविण्यासाठी निवाडे देण्याचे कामही त्या करत असत. जिजाबाई शिवरायांना सर्वच बाबतीत उत्तम शिक्षण देण्यासाठी कायम जागरूक होत्या. जिजाऊंनी शील - म्हणजेच आपले चरित्र स्वच्छ ठेवणे, सत्यप्रियता – नेहमी सत्याची बाजू घेणे, वाक्चातुर्य – आपल्या बोलण्यातून व्यक्तीवर छाप पाडणे, दक्षता – सतत सावध राहणे, धैर्य – प्रत्येक गोष्टीला धीराने संयमाने सामोरे जाणे, निर्भयता – कुणालाही न घाबरणे, शस्त्रप्रयोग – युद्धात वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांचा योग्य पद्धतीने वापर करणे, विजयाकांक्षा – नेहमी विजयाची इच्छा बाळगणे, स्वराज्यस्वप्न –स्वराज्याचे स्वप्न पाहणे ह्या सर्व गोष्टींचे संस्कार शिवरायांवर केले