स्वराज्य स्थापना

स्वराज्यस्थापनेसाठी हालचाली

views

3:44
स्वराज्यस्थापनेसाठी हालचाली :- शिवाजी महाराजांकडे असणारे पुणे, चाकण यांसारखे प्रदेश जहागीर म्हणून असले तरी त्या प्रदेशात असणारे किल्ले त्यांच्या ताब्यात नव्हते. तर ते विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात होते. त्या काळात किल्ल्यांचे विशेष महत्त्व होते. किल्ला ताब्यात असला म्हणजे किल्ल्याच्या आजूबाजूच्या प्रदेशांवरही नियंत्रण ठेवता येत असे. त्याकाळात ‘ज्याचे किल्ले त्याचे राज्य’ अशी परिस्थिती होती. म्हणजेच राज्य स्थापन करण्यासाठी किल्ले मिळविणे खूप गरजेचे होते. म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या प्रदेशातील किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचे ठरविले. किल्ले ताब्यात घेणे म्हणजेच आदिलशहाच्या विरोधात जावे लागेल हे महाराजांना माहीत होते. तरीही महाराजांनी किल्ले घेण्याचे ठरविले. त्यांनी तोरणा, मुरुंबदेव, कोंढाणा, पुरंदर यांसारखे किल्ले ताब्यात घेतले. त्यांनी आपल्या जहागिरीतील मुरुंबदेव किल्ल्याची परत व्यवस्थित बांधणी करून त्या गडास ‘राजगड’ हे नाव दिले. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. मुलांनो, एका मुस्लीम ग्रंथकाराने राजगडाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, हा किल्ला सर्व किल्ल्यांत उंच आहे. त्याची मजबुती भक्कम आहे. त्याचप्रमाणे डोंगर दऱ्यात आणि दाट अशा घनदाट अरण्यात हा किल्ला आहे. या किल्ल्यात वाऱ्याशिवाय कोणीही आत जाऊ शकत नव्हते. म्हणूनच महाराजांनी आपले राजकीय केंद्र म्हणून या गडाची निवड केली.