स्वराज्य स्थापना Go Back सिद्दी जौहरची स्वारी views 4:10 सिद्दी जौहरची स्वारी :अफजलखानाच्या वधानंतर संतप्त झालेल्या आदिलशाहाने परत महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी कर्नुल प्रांताचा सरदार सिद्दी जौहर यास पाठविले.त्याच्या मदतीसाठी रुस्तुम– ए –जमान, बाजी घोरपडे व अफजलखानचा मुलगा फाजलखान हेही होते. या परिस्थितीत महाराज पन्हाळयावर होते. पन्हाळा गडाला वेढा देण्यात आला. पन्हाळा गड व आसपासच्या प्रदेशावर सिद्दी जौहरने कब्जा मिळविला. सुमारे पाच महिने हा वेढा होता. महाराजांना वेढ्यातून बाहेर पडणे कठीण झाले होते. नेताजी पालकर हे बाहेरून सिद्दीच्या सैन्यावर हल्ला चढवीत होते. परंतु, सिद्दीच्या अफाट सैन्यापुढे या थोड्या सैन्याचा निभाव लागत नव्हता. सिद्दी वेढा उठवणार नाही असे लक्षात येताच महाराजांनी सिद्दीशी बोलणी सुरू केली. त्यामुळे सिद्दीला वाटले शिवाजी घाबरला आणि त्यामुळे तो थोडा गाफील झाला. याचाच फायदा महाराजांनी घेतला. सिद्दीचे सैन्य विजय जल्लोष करू लागले. याच दरम्यान महाराजांनी एक योजना आखली. दरम्यान महाराज वेढ्यातून सुटून विशाल गडाकडे निघाले आहेत ही बातमी सिद्दीला समजली होती. त्याच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. बाजीप्रभूने गजापूरजवळ असणाऱ्या घोडखिंडीत सिद्दीच्या सैन्यास अडवले. बाजीप्रभू व त्याच्या सहका-यांनी अतिशय धाडसाने लढा दिला. यात बाजीप्रभू मरण पावले. बाजीप्रभूच्या पराक्रमामुळे महाराजांना विशाळगडावर सुखरूप पोहचता आले. महाराज विशाळ गडाकडे जात असताना त्यांनी पालवनचे दळवी, शृंगारपूरचे सुर्वे, या आदिलशाही सरदारांचा विरोधही मोडून काढला. आणि त्यानंतर महाराज गडावर सुखरूप पोहचले. प्रस्तावना वीरमाता जिजाबाई शिवरायांचे सहकारी राजमुद्रा स्वराज्यस्थापनेसाठी हालचाली अफजलखानाचे पारिपत्य सिद्दी जौहरची स्वारी