स्वराज्याचा राज्यकारभार

तत्कालीन खेड्यांचे अर्थकारण

views

3:41
तत्कालीन खेड्यांचे अर्थकारण: पूर्वी शेती हा खेड्यातील प्रमुख व्यवसाय असल्याने शेती व्यवसाय हा खेड्यातील अर्थकारणाचा कणा होता. खेड्यात शेती व्यवसायाला पूरक असे व्यवसाय चालत असत. शेतकरी शेती पिकवत असे व गावाची अन्नाची गरज भागवत असे. तर गावातील कारागीर वस्तूंचे उत्पादन करत व ते त्या खेड्यातील लोकांच्या गरजा भागवत.उदाहरणार्थ: लोहार- लोहार हा अवजारे बनवत असे आणि तसेच लोखंडाच्या वस्तू बनवत असे. कुंभार: कुंभार मातीची भांडी बनवीत असे. त्यामुळे गावाच्या गरजा गावातच पूर्ण होत असत. त्यामुळे त्या वेळची खेडी स्वयंपूर्ण होती. खेडेगावामध्ये वस्तू- विनिमय पद्धत होती. म्हणजेच एखाद्या सेवेच्या किंवा वस्तूच्या बदल्यात त्या व्यक्तीस पैसे न देता वस्तू किंवा धान्य देणे ही पध्दत होय. या पद्धतीच्या केंद्रस्थानी शेतकरी होता. अशा महत्त्वाच्या व नेहमीच्या गरजा जे भागवत त्यांना बलुतेदार म्हणत. तर अशा कारागिरांना शेतकरी आपल्या उत्पादनातील काही भाग देत असत त्याला ‘बलुत’ म्हणत. बलुतेदार पिढ्यानपिढ्या तेच ठराविक काम करीत. बलुतेदारांची संख्या 12 होती. उदा. गुरव, चांभार, कुंभार, सुतार, लोहार इत्यादी. व्यापार आणि उद्योग:व्यापार म्हणजे वस्तूंची खरेदी-विक्री आयात-निर्यात किंवा देवाण-घेवाण होय. महाराजांना नेहमी असे वाटत असे की व्यापारात वाढ झाल्याशिवाय राज्याची भरभराट किंवा राज्य समृद्ध होणार नाही. व्यापारांमुळे नवनवीन आणि गरज असणाऱ्या वस्तू राज्यांत येतात.महाराजांनी जसे शेतीत फार मोठे बदल घडवून आणून सुधारणा केल्या, तसेच त्यांचे उद्योगांबद्दलही मत होते. त्यांनी स्वराज्यातील उद्योगांना संरक्षण देण्याचे धोरण आखले होते.