आदर्श राज्यकर्ता Go Back महाराजांच्या कार्याची थोरवी – पुढील भाग views 3:08 स्त्रियांबरोबर कोणी वाईट वर्तणूक केली तर असे करणाऱ्यास महाराज एकदम कठोर शिक्षा देत. त्यांच्या राज्यातील पाटीलाने एका मुलीवर हात टाकला होता. तर महाराजांनी त्यांचे हात कापले होते. त्यांची सैन्याला सक्त ताकीद असे की, पर राज्यातील लहान मुले, वृद्ध व स्त्रियांना हात लावू नये, प्रजेतील शेतकरी, कारागीर, सैनिक व व्यापारी अशा सर्व घटकांची ते काळजी घेत. दुसऱ्या धर्मातील व्यक्तींविषयी त्यांच्या मनात नेहमी आदर असे, ते कधीही भेदभाव करीत नसत. व्यक्तींना परत स्वधर्मात घेण्याला ज्या काळात विरोध होता, त्या काळात त्यांनी अशा व्यक्तींना परत स्वधर्मात घेतले. एवढेच नाही तर त्यांच्याशी स्वत:चे नातेही जोडले. नेताजी पालकर हे स्वराज्याचे सरनौबत होते. तसेच त्यांना प्रतिशिवाजी म्हणजे दुसरा शिवाजी म्हणत. नेताजीचे आणि महाराजांचे काही वाद झाले. तेव्हा नेताजी पालकर विजापूरला जाऊन मिळाले. नंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना मुघलांकडे वळविले. आग्र्यात नेताजींचे चार दिवस हाल करून, त्यांना धर्मांतर करून मुस्लीम धर्म स्वीकारायला लावला. त्यांचे नाव महम्मद कुलिखान असे ठेवले. पुढे 9 वर्ष ते काबूल, कंदहार या शहरांत मोहिमेवर होते. पश्चाताप झालेले नेताजी मुघल छावणीतून पळून १६७६ रोजी रायगडावर महाराजांकडे आले. महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मात घेतले आणि त्यांच्याशी आपले नातेही जोडले. प्रस्तावना रयतेची काळजी सहिष्णू वर्तन स्वातंत्र्याची प्रेरणा महाराजांच्या कार्याची थोरवी – उर्वरित भाग महाराजांच्या कार्याची थोरवी – पुढील भाग