इतिहासाची साधने

प्रस्तावना व लिखित साधने भाग १

views

3:58
प्रस्तावना व लिखित साधने भाग १ :- भूतकाळाविषयीची माहिती ज्यातून मिळू शकते अशा साधनांना इतिहासाची साधने म्हणतात. आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला आहे. त्यामध्ये आपण वैदिक किंवा हडप्पा संस्कृती, शिवाजी महाराजांचा इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य लढा या वेगवेगळ्या कालखंडातील घटनांचा अभ्यास केला आहे. परंतू, आपण सन १९६१ ते २००० पर्यंतचा भारताचा इतिहास शिकणार आहोत. आपला नुकताच स्वतंत्र झालेला देश विकासाकडे कशी वाटचाल करतो आहे याचा अभ्यास करणार आहोत. इतिहासाची साधने या पाठात आपण इतिहासाचा अभ्यास करण्याची आधुनिक साधने बघणार आहोत. ही साधने प्राचीन व मध्ययुगीन साधनांपेक्षा वेगळी आहेत. ती साधने अशी : 1)लिखित साधने 2) भौतिक साधने 3)मौखिक साधने 4) दृक-श्राव्य साधने इतिहासाचा अभ्यास करीत असताना आपल्याला प्रथम इतिहासाची माहिती कोणत्या साधनांद्वारे मिळते ते बघणे गरजेचे असते. आधुनिक काळात इतिहासाचे लेखन करीत असताना आपल्याला प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व साधनांची दखल घ्यावी लागते. त्यांची मदत घेऊनच इतिहासाचे लेखन करता येते. लिखित म्हणजे छापलेले किंवा हाताने लिहिलेले साहित्य होय. यामधील वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे, कोशवाड्मय ही छापील साधने होत. तर रोजनिशी (डायरी), पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे हे हाताने लिहिलेले साहित्य होय. यामध्ये आणखी काही लिखित साधनांचा समावेश होऊ शकतो.उदा. शासकीय आदेश, शासनाने काढलेली फर्माने, करारनामे, तहनामे, आपापसातील पत्रव्यवहार, यांचा समावेशही लिखित साधनांमध्ये होतो.