इतिहासाची साधने

टपाल तिकिटे

views

3:18
टपाल तिकिटे :- आधुनिक इतिहासातील आणखी एक लिखित साधन म्हणजे टपाल तिकिटे होय. टपाल तिकिटे स्वतः काही सांगत नाहीत. पण त्यांच्या माध्यमातून इतिहासाची माहिती मिळविण्याचे काम इतिहासकार करीत असतात. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजपर्यंत टपाल तिकिटांच्या स्वरूपात, आकारात, रचनेत विविध बदल घडून आलेले आहेत. त्यांच्यातील या बदलांतून आपणास बदलत्या काळाविषयी माहिती समजते. टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी-पक्ष्यांवर एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृतमहोत्सवी, शतक, द्विशतक, त्रिशतकपूर्ती निमित्त तिकीट काढते. उदा. १९४७ चे म्हणजे भारत स्वतंत्र झाला, त्यावेळच्या पोस्ट तिकिटावर तिरंग्याचे चित्र आहे. तर कधी इंदिरा गांधी, महात्मा गांधी, राजीव गांधी, सचिन तेंडुलकर यांसारख्या व्यक्तींच्या प्रतिमा टपाल तिकिटावर विशिष्ट काळात होत्या. यावरून आपणास त्यात्या वेळी घडलेल्या घटनांची माहिती मिळते. तसेच तो कालखंड ही टपाल तिकिटांद्वारे समजतो. म्हणून टपाल तिकिटे ही इतिहासाचा मौल्यवान ठेवा आहेत. आपण पाहिले की, विशेष व्यक्तींच्या नावाने टपाल तिकिटे छापली जातात. असेच एक विशेष व्यक्तिमत्व होते. १९७७ मध्ये भारत सरकारने जाल कूपर हे टपाल तिकीट प्रसिध्द केले होते. त्याचे कारणही तसेच होते. जाल कूपर हे ‘टपाल तिकीट’ या विषयातील जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेल्या कूपर हयांनी ‘इंडियाज स्टँप जर्नल’ चे संपादन केले.