इतिहासाची साधने

वृत्तपत्रे

views

3:15
वृत्तपत्रे : आधुनिक इतिहासातील एक महत्त्वाचे साधन म्हणजे वृत्तपत्र होय. आपण अनेक वेळा ऐकले आहे की लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. 1) शासन 2) प्रशासन 3) न्यायव्यवस्था 4) पत्रकारिता. त्यातील लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता किंवा वृत्तपत्रे होय. वृत्तपत्रे (news paper) ही आपल्याला रोज माहिती देणारी प्रमुख साधने आहेत. आपण आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना म्हणजे १९६१ ते २००० या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांना विशेषतः वृत्तपात्रांना पर्याय नाही असेच दिसते. म्हणजे त्याकाळात वृत्तपत्रे ही प्रमुख माहितीचे स्त्रोत होते. नंतरच्या काळात भारतात उदारीकरणास सुरुवात झाली आणि त्यानंतर इंटरनेटचा (आंतरजाल) सर्वत्र प्रसार सुरू झाला. इंटरनेट हे आजच्या काळातील ज्ञानाचे व माहितीचे भांडार झाले आहे. आपल्याला हवी ती माहिती आपण काही क्षणात मिळवू शकतो. असे असले तरीही छापील प्रसारमाध्यमांचे सामर्थ्य अजूनही कायम आहे. वृत्तपत्रांचे रोज व नियमित वाचन करणे ही अत्यंत चांगली सवय आहे. वृत्तपत्रांमधून आपल्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटना, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या घटनांची माहिती आपल्याला वृत्तपत्रांतून समजते. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत. उदा. Times of India, Indian Express इ. विविध वृत्तपत्रांच्या विशिष्ट माहिती देणाऱ्या पुरवण्या आठवडयातून ठराविक दिवशी त्या वृत्तपत्राबरोबर प्रकाशित केल्या जातात.