इतिहासाची साधने

लिखित साधने भाग २

views

3:42
लिखित साधने भाग २: आता आपण आधुनिक इतिहासाच्या उर्वरित लिखित साधनांची माहिती घेऊ. नियतकालिके : विशिष्ट कालावधीने नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या मुद्रित किंवा हस्तलिखित प्रकाशनाला नियतकालिक म्हणतात. उदा. द्वैवार्षिक, वार्षिक, षणमासिक, (दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे) मासिक, पाक्षिक, साप्ताहिक, दैनिक (वर्तमानपत्र) यांसारखी नियतकालिके, इतिहासाचा अभ्यास करताना उपयोगी पडतात. रोजनिशी: आणखी एक महत्त्वाचे साधन म्हणजे रोजनिशी होय. त्याला इंग्रजीत डायरी असे म्हणतात. काही लोकांना रोज घडलेल्या महत्त्वाच्या घटना लिहून ठेवण्याची सवय असते. तिला रोजनिशी म्हणतात. या रोजनिशी वरून त्या कालखंडातील घटना प्रसंग, वेळ, दिनांक यांची माहिती मिळते. आणि या माहितीचा उपयोग इतिहासाचा अभ्यास करताना होतो. उदा. जयप्रकाश नारायण यांची प्रिझनडायरी हे एक आणीबाणीच्या काळातील इतिहासाचे महत्त्वाचे साधन समजले जाते. ग्रंथ: हे इतिहासातील महत्त्वाचे साधन आहे. ग्रंथांच्या आधारे आपल्याला विशिष्ट कालखंडातील समाजजीवन, चालीरीती यांची माहिती मिळते. उदा. अनिल अवचट यांच्या पुस्तकांतून आपल्याला त्या त्या काळातील सामाजिक प्रश्न, दंगली, चळवळी ह्यांची विश्वसनीय माहिती मिळते. पत्रव्यवहार: शासनातील महत्त्वाच्या विभागांसोबत झालेला पत्रव्यवहार, तसेच महत्त्वाच्या व्यक्तींचा आपसातील पत्रव्यवहार हे इतिहासाचे महत्वाचे साधन असते. परंतु हयातील माहिती अन्य साधनाच्या आधारे पारखून घेणे महत्वाचे असते. सरकारी गॅझेट : पुढील महत्त्वाचे व आधुनिक इतिहास अभ्यासाचे साधन म्हणजे सरकारी गॅझेट होय. सरकारी गॅझेट म्हणून सरकार दरबारी असलेली संपूर्ण माहितीची नोंद होय. उदा. नाव, जन्मतारीख, गाव इ. आपल्याला जर नावात बदल करावयाचा असेल तर गॅझेट करावे लागते.