इतिहासाची साधने Go Back प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) views 3:09 प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) :- प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना २७ ऑगस्ट १९४७ साली झाली. काम करण्यास प्रारंभ १-२-१९४९ पासून झाला. PTI चा स्वतःचा उपग्रह आहे. त्याद्वारे इंटरनेट व इतर माध्यमातून बातम्या वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. या संस्थेत जवळपास १३०० कर्मचारी काम करतात. यातील ३५० पत्रकार आहेत. १९५३ नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे तपशील, महत्त्वाच्या विषयावरील लेख यासाठी PTI हा महत्त्वाचा माहिती देणारा स्त्रोत आहे. यांनी वृत्तपत्रांना वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख पुरवलेले आहेत. आता पीटीआयने ऑंनलाईन सेवा सुरू केली आहे. १९९० च्या दशकात त्यांनी टेलीप्रिंटर्सऐवजी ‘उपग्रह प्रसारण’ तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. यामुळे आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे. तुम्हाला हे माहीत असायला हवे की: छापील माध्यमात भारत सरकारचे जे प्रकाशन विभाग आहे त्यांच्या मार्फत काढण्यात येणाऱ्या वार्षिकांमधील माहिती विश्वसनीय वा खात्रीशीर असते. उदा. भारत सरकारच्या ‘माहिती व प्रसारण खात्याने’ ‘INDIA 2000’ हा वार्षिक संदर्भग्रंथ प्रसिध्द केला आहे. हा ग्रंथ ‘संशोधन, संदर्भ व प्रशिक्षण’ या विभागांतर्गत तयार केला आहे. त्यामुळे त्यातील माहिती ही संशोधनानंतर समोर आलेली माहिती आहे. या ग्रंथात मानवी जीवनाशी निगडीत सर्व घटनांचा आढावा घेण्यात आला आहे. प्रस्तावना व लिखित साधने भाग १ लिखित साधने भाग २ वृत्तपत्रे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) टपाल तिकिटे भौतिक साधने मौखिक साधने