गुणाकार भाग १

दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणणे

views

3:50
दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणणे: आता आपण दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने कसे गुणतात ते पाहू या. त्यासाठी हे उदाहरण पहा.उदाहरण: कवायतीसाठी १५ रांगेत मुले उभी केली. प्रत्येक रांगेत ३७ मुले आहेत. तर एकूण किती मुले आहेत?शि: मुलांनो, पहा या उदाहरणामध्ये आपल्याला १५ × ३७ यांचा गुणाकार करावा लागेल.सर्वप्रथम दिलेल्या दोन्ही संख्यांचा विस्तार करून घेऊया. १५ = १०+ ५ व ३७ = ३० + ७ × १० ५३० ७ अशा प्रकारे मांडणी करून घेऊया, उभ्या चौकटीतील १० व आडव्या चौकटीतील ३० यांचा गुणाकार आपण करू. बघा मुलांनो, येथे १ नंतर शून्य व ३ नंतर सुद्धा शून्य आहे. म्हणून ते दोन शून्य लिहून घेऊ. नंतर ३ ने १ ला गुणू. म्हणून १० गुणिले ३० बरोबर ३०० (१० × ३ =३००) उत्तर मिळाले. ते आपण १० च्या खालील चौकटीत लिहिले. त्यानंतर ३० ने ५ ला गुणू. येथे फक्त ३ नंतर एक शून्य आहे. म्हणून आपण पहिला शून्य लिहून घेतला. नंतर ३ ने ५ ला गुणले असता १५ उत्तर मिळाले. याचाच अर्थ ३० गुणिले ५ बरोबर १५० उत्तर मिळते, ते १५० आपण ५ च्या खाली चौकटीत लिहिले. आता आपल्याला ७ ने १० ला गुणावे लागेल. १० गुणिले ७ = ७० म्हणून ते आपण ३०० च्या खालील चौकटीत लिहिले. ७ गुणिले ५ = ३५ हेही आपण १५० च्या खालील चौकटीत लिहिले. आता आपण आलेला सर्व गुणाकार बाजूला एका खाली एक लिहून त्यांची बेरीज करू. म्हणजेच १५ × ३७= ५५० उत्तर आले. तर १५ रांगेत ५५० मुले उभी असतील.