गुणाकार भाग १

तीन अंकी संख्येला गुणणे

views

3:33
तीन अंकी संख्येला गुणणे: आता आपण तीन अंकी संख्येला कसे गुणावे ते बघूया. शतक संख्येला एक अंकी संख्येने गुणणे. ४ × १०० म्हणजेच ४ × १ शतक = ४०० कारण १ शतक म्हणजे १०० म्हणून ४ शतक = ४००. ६ × १०० = ६०० म्हणजेच ६ शतक. २ × ४०० = ८००. येथे २ व ४ चा गुणाकार केला. त्यापुढे उरलेली शून्ये लिहिली. मुलांनो, लक्षात घ्या की पूर्ण शतक संख्येला दुसऱ्या संख्येने गुणताना शतकातील अंकाला त्या संख्येने गुणावे आणि आलेल्या गुणाकारापुढे दोन शून्ये लिहावीत. यासाठी आणखी काही उदाहरणे पाहू म्हणजे अधिक स्पष्ट होईल. उदाहरण 1) ६०० × ४ या उदाहरणात ६०० ही पूर्ण शतक संख्या आहे. या शतक संख्येतील ६ या अंकाला ४ ने गुणू व आलेल्या गुणाकाराच्या पुढे दोन शून्ये लिहू. जसे ६०० × ४ = २४००.