गुणाकार भाग १

तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे

views

4:10
तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे : मुलांनो, आता आपण चौकटी पद्धतीने तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने कसे गुणायचे ते पाहूया. यासाठी काही उदाहरणे सोडवू. उदाहरण१ : पाठ्यपुस्तकाच्या एका संचाची किंमत २४५ रुपये आहे. तर अशा ८ संचांची किंमत किती? उत्तर: पहा मुलांनो, ८ संचांची किंमत ही एका संचाच्या किमतीच्या आठ पट असेल. म्हणून २४५ आणि ८ यांचा गुणाकार करावा लागेल. सर्वप्रथम आपण २४५ या तीन अंकी संख्येचा विस्तारकरू म्हणून २४५ = २०० + ४० + ५ आता २०० ला ८ ने गुणू. २०० ही पूर्ण शतक संख्या आहे. म्हणून २ व ८ यांचा गुणाकार करू व त्यापुढे २ शून्ये लिहू. म्हणून २०० × ८ = १६०० झाले. नंतर ४ व ८ यांचा गुणाकार करू. त्यापुढे एक शून्य देऊ. म्हणून ४० × ८ = ३२० झाले. शेवटी ५ व ८ यांचा गुणाकार करूया. ८ × ५ = ४० झाले. आता हा सर्व गुणाकार उभ्या मांडणीत बाजूला लिहू आणि बेरीज करूया. १६०० + ३२० + ४ यांची बेरीज झाली, १९६०. म्हणजेच २४५ × ८ = १९६०. म्हणून ८ संचांची किंमत १९६० रुपये होईल.