पृथ्वी आणि जीवसृष्टी

प्रस्तावना

views

2:37
पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागात जमीन तर काही भागात पाणी दिसते. या पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे. पृथ्वीवर जमिनीवर राहणारे कुत्रा, वाघ, सिंह, मांजर, हत्ती यांसारखे प्राणी असतात. तर पाण्यात राहणारे मासा, कासव, बेडूक यांसारखे प्राणी असतात. आणि हवेत म्हणजे वातावरणात उडणारे चिमणी, कावळा, पोपट, घार यांसारखे पक्षी असतात. उडणारे डासांसारखे कीटक असतात. न दिसणारे सूक्ष्मजीवही असतात. म्हणजेच जमिनीवर, पाण्यात, हवेत या तीनही ठिकाणी सजीवांचे अस्तित्व असते. पृथ्वीवरील अनेक नैसर्गिक घडामोडींना सूर्य कारणीभूत ठरतो. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते. त्याचे ढगात रुपांतर होऊन पाऊस पडतो. वनस्पती सूर्याच्या उष्णतेपासून आपले अन्न स्वतः तयार करतात. पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा आणि सजीव हे शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचे प्रतिनिधित्व करतात. जीवावरण हे इतर तीनही आवरणांत दिसून येते.