पृथ्वी आणि जीवसृष्टी

शिलावरण

views

3:06
शिलावरण म्हणजे काय ते पाहू. तुम्ही नारळाचे बाहेरील कवच सगळ्यांनीच पाहिले असेल. सांगा बरं ते कसे असते? कठीण, टणक असते. नारळाप्रमाणेच पृथ्वीचे बाहेरील कवचही कठीण असते. ते माती व खडकांचे बनलेले असते. आपण डोंगराळ भागातून प्रवास करताना जमिनीचे किंवा खडकांचे थर पाहतो. डोंगर फोडून रस्ता काढला असल्याने हे थर आपल्याला दिसतात. आपल्या आजूबाजूची कोठे जमीन पिकांनी तर कोठे झाडांनी झाकलेली असते. काही ठिकाणी झाडाच्या मुळांनी भरलेले मातीचे खोलवरचे थर दिसतात, तर काही ठिकाणी झाडाच्या मुळांनी भरलेले खडक दिसतात. काही ठिकाणी पर्वतांचे उंचच उंच उतार दिसतात. तर कोठे मोठमोठे खडक दिसतात. पृथ्वीवरील हा सर्व जमिनीचा थर शिलावरणाचा भाग आहे. आपल्या पृथ्वीचा बराचसा भाग पाण्याने व्यापला आहे. या पाण्याखालीही शिलावरण असते. पृथ्वीचे बाहेरील कवच व त्या खालील थराचा काही भाग मिळून शिलावरण बनते. जमिनीचे खडक किंवा सागरांच्या तळाखाली असलेले खडक हे शिलावरणाचेच भाग होत. शिलावरणाची जाडी किती आहे, हे प्रत्यक्ष मोजणी करून पाहता येणे शक्य झालेले नाही. पण अप्रत्यक्ष रीतींनी केलेल्या मोजण्यांवरून असे कळून आले आहे की, शिलावरणाची जाडी सर्वत्र सारखी नसून कमीअधिक आहे. महासागरांखाली असलेल्या शिलावरणाची जाडी ५ ते १० किमी. किंवा काही जागी त्यापेक्षाही कमी आहे. खंडे असलेल्या भागातील शिलावरण ३० ते ४५ किमी. तर काही जागी त्यापेक्षा अधिक जाड आहे. एकूण शिलावरणाची सरासरी जाडी सु. १५-२० किमी. इतकीच भरेल.