वस्त्र

तुम्हाला माहीत आहे का?

views

4:05
कापसापासून धागा व धाग्यापासून कापड बनते. कापडाशिवाय रेशीम, लोकर, तागाचे धागे, कृत्रिम धागे इ. पासून कापड तयार करता येते. कापडांना विशिष्ट नावे आहेत. कॉटन, सिल्क, वुलन, ज्यूट, पॉलिएस्टर, नायलॉन, रेयॉन इ. नावे आहेत.कॉटन म्हणजे सुती कापड, कापसापासून बनते. सिल्क रेशमापासून बनते. रेशीम रेशमाच्या किड्यापासून मिळते वुलनचे कापड लोकरीपासून बनते. तर ज्यूटचे कापड तागापासून बनते. पॉलिएस्टर, नायलॉन, रेयॉन ही कापडे कृत्रिम धाग्यापासून बनतात. कॉटनचे कापड इचलकरंजी, मालेगाव इथून येते. किंवा कॉटन साड्या आंध्रप्रदेश, बंगालमधूनही येतात. सिल्कच्या साड्या बनारसहून किंवा दक्षिणेतील तामिळनाडू, कर्नाटक, केरळ इथून येतात. कृत्रिम धाग्यांपासून कापड अनेक ठिकाणी बनते. ते प्रत्येक ताग पाहूनच सांगावे लागेल.