वस्त्र

लोकांचा पोशाख

views

2:45
सण, समारंभ, उत्सव अशा वेळी ते आपल्या पोशाखात बदल करतात. रोजच्या पेक्षा जरा वेगळे कपडे ते घालतात. या लोकांच्या पोशाखात विविधता असण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात सांस्कृतिक व भौगोलिक विविधता आहे. आदिवासी, कोळी, धनगर, शेतकरी, वारकरी यांसारख्या लोकांची सांस्कृतिक परंपरा वेगवेगळी असल्याने त्यांच्या पोशाखातही विविधता असते. तसेच उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तीन ऋतूंमानानुसारही पोशाखात विविधता दिसून येते. तरीही हवामानाचा विचार केला तर महाराष्ट्रात सुती कपडे जास्त वापरले जातात. हा प्रयोग घरी करावयाचा आहे. तुमचे आजी-आजोबा, आई-वडील व नातेवाईकांची जुनी व नवीन छायाचित्रे एकत्रित करा. ती कोणत्या वर्षात काढली आहेत, ते त्यांना विचारून छायाचित्रांच्या मागे वर्ष लिहा. आता ही छायाचित्रे वर्षांनुसार लावून घ्या. त्यांच्या पोशाखात होत गेलेले बदल निरीक्षणाने समजून घ्या. असे बदल होण्यामागची करणे जाणून घ्या. व ती तुमच्या नोंदवहीत लिहा.