वस्त्र

जरा, डोके चालवा

views

1:34
नायलॉन व पॉलिएस्टर नॅफ्था नावाच्या पदार्थांपासून बनवतात. याचे धागे कारखान्यात बनविले जातात. नायलॉन व रेयॉन हे डांबरासारख्या पदार्थांपासून बनते. डांबर हा शब्द उच्चारल्यानंतर तुमच्या समोर रस्त्यावर दिसणारे डांबर आले असेल. पण हे ते डांबर नव्हे. नॅफ्थाऐवजी याठिकाणी डांबर या शब्दाचा वापर केला आहे. नायलॉन व पॉलिएस्टर नॅफ्था नावाच्या पदार्थांपासून बनवतात. याचे धागे कारखान्यात बनविले जातात. हा नॅफ्था पदार्थ रसायन आहे. कापसाच्या धाग्याप्रमाणे किंवा रेशीम आणि लोकर प्रमाणे ते मिळत नाहीत. कापड विणण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे कापड सुयांच्या साहाय्याने विणले जाते. आपण दारावरची तोरणे पाहतो, मुलांचे स्वेटर पाहतो, आजोबांनी घातलेली कानटोपी पाहतो, हे सर्व या सुयांच्या साहाय्यानेच विणले जाते. या सुया लांब टोकदार असतात. आणि दुसरी पद्धत म्हणजे हातमाग किंवा यंत्रमाग. हातमागाचा वापर पूर्वीच्या काळात जास्त केला जात होता. आता मात्र यंत्रमागाचा वापर सर्वत्र अधिक आढळतो.