पाहू तरी शरीराच्या आत

आंतरेंद्रिये

views

3:48
आंतरेंद्रिये म्हणजे शरीराच्या आत असणारी इंद्रिय, म्हणजेच अवयव होत. ही इंद्रिये आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत. आपण आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या व शरीराच्या आत असणाऱ्या आंतरेंद्रियांची माहिती घेणार आहोत. लिहिणे, चालणे, ऐकणे ही आपल्या शरीराची कामे विविध अवयवांच्या मदतीने पार पडत असतात. तशीच शरीराच्या आतील भागातही शरीराची अनेक कामे पार पडत असतात. आपल्या शरीरात संपूर्ण शरीरभर रक्तवाहिन्यांचे जाळे पसरलेले असते. त्या रक्तवाहिन्यांमधून रक्त सतत फिरत असते. श्वासावाटे आपण बाहेरील हवा शरीरात घेतो. ती रक्तामार्फत संपूर्ण शरीरभर पोहोचवली जाते. आपण जे अन्न खातो त्याचे पचन होते. ही सर्व कामे शरीराच्या आतील इंद्रिये करतात. त्यांना आंतरेंद्रिये असे म्हणतात. शरीरातील इंद्रियांसाठी विशिष्ट जागा आहेत. ती इंद्रिये आपली जागा सोडून इकडे तिकडे हालणार नाहीत अशीच त्यांची रचना असते. म्हणून कितीही धावलो, उलटे-पालटे झालो तरीही आपली आंतरेंद्रिये आहे त्या जागीच असतात.