पाहू तरी शरीराच्या आत

फुफ्फुसे

views

3:14
ह्दयानंतर शरीरातील महत्त्वाचे इंद्रिय म्हणजे फुफ्फुसे होत. आपण श्वसन करतो तेव्हा नाकावाटे हवा शरीरात घेतो. आत घेतलेली ही हवा ज्या आंतरेंद्रियाद्वारे संपूर्ण शरीराला पुरवली जाते, त्यांना फुफ्फुसे असे म्हणतात. आपल्याला दोन फुफ्फुसे असतात व ती वक्षपोकळीत असतात. त्यांतील एक डाव्या बाजूला आणि दुसरे उजव्या बाजूला असते. दोन फुफ्फुसांच्या मध्ये किंचित डाव्या बाजूला ह्दय असते. तिथे डाव्या फुफ्फुसामध्ये खोलगट जागा असते. उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते. जसे तोंडातील घास जठरापर्यंत पोहचविण्यासाठी ग्रासनलिका असते, तसेच नाकावाटे घेतलेली हवा फुफ्फुसांपर्यंत पोहचवण्यासाठी एक नळी सारखे आंतरेद्रिय असते. त्याला श्वासनलिका असे म्हणतात. श्वासनलिकेला पुढे दोन छोटे फाटे फुटतात. त्या फाट्यांना श्वसनी म्हणतात. श्वास घेतल्याने फुफ्फुसे थोडीशी प्रसरण पावतात. त्यामुळे आपण श्वास घेतल्यानंतर आपली छाती फुगते. मुलांनो, ह्दय आणि फुफ्फुसे यांची कामे एकमेकांवर अवलंबून असतात. ह्दय जोरात काम करू लागले की फुफ्फुसेही जलद गतीने काम करतात. ही दोन्ही इंद्रिये महत्त्वाची आहेत. ती वक्षपोकळीत बरगड्यांच्या पिंजऱ्यात असतात. म्हणून ती सुरक्षित असतात.