पाहू तरी शरीराच्या आत

ह्दयाचे कार्य

views

2:25
तुम्ही सर्वांनी तुमचा तळहात छातीवर मध्यभागी पण थोडासा डावीकडे ठेवा. तुमच्या ह्दयाचे ठोके जाणवतात का? याचा अनुभव घ्या.आता आपण हे ह्दयाचे ठोके कसे पडतात, याची माहिती घेणार आहोत. ह्दयाचे आकुंचन व शिथिलीकरण हे आपण पाहिले आहे. या क्रिया आलटून पालटून न थांबता होत असतात. ह्दय आकुंचन पावले की, ह्दयातील रक्त रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते पुढच्या प्रत्येक आकुंचनाच्या वेळी ते पुढेपुढे ढकलले जाते. ह्दयाच्या प्रत्येक आकुंचनाला ह्द्याचा ठोका म्हणतात. आपला तळहात छातीवर मध्यभागी, पण किंचित डावीकडे ठेवला तर ह्दयाचे ठोके जाणवतात. जसे मघाशी आपल्याला जाणवले. असेच अजून एक शरीरातील ठोके असतात. ते म्हणजे डॉक्टर पाहातात ते नाडीचे ठोके होय. मनगटापाशी त्वचेच्या अगदी जवळून जाणारी रक्तवाहिनी असते. तिथे बोटे टेकवली तरी हे ठोके आपल्याला जाणवतात. त्या ठोक्यांनाच आपण नाडीचे ठोके म्हणतो. हदय आकुंचन पावले की रक्तवाहिन्यांमध्ये ह्दयातील रक्त ढकलले जाते. कारण ह्दय हे एखाद्या बंदिस्त पिशवीप्रमाणे आहे. त्यावर आकुंचनाने दाब पडतो. बंदिस्त जागेतील द्रवपदार्थांवर दाब दिला की जागा मिळेल तेथून द्रवपदार्थ जोराने बाहेर पडतो. तसेच ह्दय आकुंचन पावले की हदयातील रक्त रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते.