पाहू तरी शरीराच्या आत

आपण काय शिकलो

views

2:14
१. शरीराच्या आत चालणारी अनेक महत्त्वाची कामे वेगवेगळी इंद्रिये करतात. अशी इंद्रिये शरीराच्या आत असतात. ती बाहेरून दिसत नाहीत. त्यांना आंतरेंद्रिये म्हणतात. २. डोके आणि धड यांच्या आत असणाऱ्या पोकळ्यांमध्ये आंतरेंद्रिये सुरक्षित राहतील अशी रचना शरीरात असते. ३. गिळलेला घास घशापासून जठरापर्यंत पोहचवण्याचे कार्य ग्रासनलिका करते. तिलाच अन्ननलिका म्हणतात. आणि ती वक्षपोकळीत असते. ४. ह्दय शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त खेळते ठेवते. त्यासाठी ते सतत आकुंचन पावते आणि शिथील होत असते. ह्दयाच्या आकुंचनामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ह्दयातील रक्त ढकलले जाते. ५. श्वसनावाटे शरीरात घेतलेली हवा ज्या आंतरेंद्रियांमार्फत शरीराला पुरवली जाते, त्यांना फुफ्फुसे म्हणतात. उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते. ६. ह्दय आणि फुफ्फुसे वक्षपोकळीतील बरगडयांच्या पिंजऱ्यात सुरक्षित असतात. ७. मेंदू आपले अत्यंत महत्त्वाचे आंतरेंद्रिय आहे. शिरोपोकळीत कवटीच्या आत मेंदूला सुरक्षित स्थान असते. हालचालींवर नियंत्रण ठेवणे, भावनांची जाणीव होणे आणि ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थ लावणे ही मेंदूची कामे आहेत.