कुटुंबातील मूल्ये

सांगा पाहू

views

3:42
मी तुम्हांला काही प्रसंग सांगते त्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी काय करावे हे तुम्ही सांगायचे आहे. प्रसंग – 1 :- आफरीनने मिनूकडे पेन्सिल मागितली. लिहून झाल्यावर तिने पेन्सिल परत केली. प्रसंग – 2 :- शमा सायकलवरून पडली. आईला सांगताना मात्र तिने ‘नेहाने मला पाडले’ म्हणून मी पडले, असे सांगितले. प्रसंग – 3 :- रिक्षात सापडलेली पिशवी मेरीने जवळच्या पोलिस चौकीत जमा केली. मुलांनो, आता सांगा, या तीन प्रसंगातील कोणाचे वागणे प्रामाणिकपणाचे आहे. पहिल्या प्रसंगातील आफरीनचे वागणे प्रामाणिकपणाचे आहे. दुसऱ्या प्रसंगातील नेहाचे वागणे अप्रामाणिकपणाचे आहे. आणि तिसऱ्या प्रसंगातील मेरीचे वागणेही प्रामाणिकपणाचे आहे. आपण नेहमी प्रामाणिकपणे वागले पाहिजे. अप्रामाणिकपणे वागल्यास आपण कोणाच्याही विश्वासास पात्र राहात नाही. आता आपण प्रामाणिकपणाचे व अप्रामाणिकपणाचे परिणाम पाहू. आपण समाजात, कुटुंबात वावरत असताना आपल्या हातून अनेक चांगल्या - वाईट गोष्टी घडत असतात. काही गोष्टी नकळत घडत असतात. कधी कधी आपल्या हातून चुकाही होतात. उदा. न विचारता एखादी गोष्ट करणे, दुसऱ्याची वापरायला घेतलेली वस्तू वेळेवर परत करायची राहून जाणे. यांसारख्या चुका आपल्या हातून घडत असतात. चूक कबूल करणे हे खूप प्रामाणिकपणाचे काम आहे. आपल्याकडून एखादी चूक झाली आहे, ही गोष्ट आपल्या लक्षात येताच आपण त्याबाबत आपल्या आईवडिलांशी, भावंडांशी, मित्रमैत्रिणींशी मोकळेपणाने बोलावे. मोठी माणसे तुम्हांला समजून घेतात. त्यांना झालेली गोष्ट खरीखरी सांगितली की ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करून चूक सुधारण्याची संधी देतात. तसेच त्यातून आपला प्रामाणिकपणा दिसून येतो. आपल्याला अशा गोष्टींतून त्यांचा विश्वास संपादन करता येतो. परंतु एकदा केलेली चूक परत परत करू नये. तसेच आपले काम मेहनतीने व प्रामाणिकपणे करणेही आवश्यक आहे. आपल्यांमधील नातेसंबंध टिकवून ठेवणे व नात्यांमधील परस्परांबददलचा विश्वास आपल्याकडून प्रयत्न करून जपणे व कोणाचीही फसवणूक न करणे हे सुद्धा प्रामाणिकपणाचे लक्षण आहे. आपल्यात जर प्रामाणिकपणा असेल तर आपल्याला कोणाचीही भीती बाळगण्याची किंवा भीती वाटण्याचे कारण नाही. कारण आपण काहीच लपवत नसतो. याउलट आपण अप्रामाणिकपणे वागल्यास आपला आत्मविश्वास कमी होतो. अप्रामाणिकपणा म्हणजे एखादयाला फसविणे, खोटे बोलणे यांसारख्या कृती आपण केल्या तर आपले खोटे बोलणे उघडकीला येईल की काय याची सतत भीती वाटत राहते. कुटुंबात वावरत असताना तसेच आपल्या सार्वजनिक जीवनात म्हणजेच समाजात वावरतानाही प्रामाणिकपणे वागले पाहिजे. आपण जर प्रामाणिकपणे वागलो तर आपल्याबद्दल सर्वांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण होते व आपल्याबद्दल सर्वांनाच आदर वाटतो. समाजातील व्यक्तींकडून आपल्याला मान-सन्मान व प्रतिष्ठा प्राप्त होते. तसेच प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते.