कुटुंबातील मूल्ये

काय करावे बरे ?

views

3:15
मी तुम्हांला काही प्रसंग सांगते त्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी काय करावे हे तुम्ही सांगायचे आहे. रस्ता चुकलेला मुलगा तुम्हांला भेटला तर तुम्ही काय कराल? आम्ही त्या मुलाला त्याचे नाव- पत्ता विचारू. शक्य झाल्यास त्याला त्याच्या घरी सोडून येऊ. किंवा त्याला जवळच्या पोलिस चौकीत सोडू. म्हणजे त्याचे पालक येऊन त्याला घेऊन जातील. समजा सहलीला गेल्यावर तुमच्या लक्षात आले की, तुमच्या मैत्रिणीचा डबा घरी विसरला आहे, तर तुम्ही काय कराल? आम्ही इतर मित्र प्रत्येकाच्या डब्यातील भाजी-चपाती थोडी थोडी तिला खायला देऊ. शाब्बास! इमारतीतल्या लिफ्टमध्ये काही व्यक्ती अडकल्या आहेत. तुम्ही काय कराल? आम्ही ही बाब लगेच वॉचमेन व सोसायटीमधील इतर व्यक्तींच्या लक्षात आणून देवू. व त्या अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू. शि: बरोबर आहे मुलांनो! अशाच पद्धतीने सर्वांना सहकार्य करणे, मदत करणे, एखाद्याची संकटातून मुक्तता करणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. संवाद १) आपले शिक्षक आपल्याला किल्ला दाखवायला नेणार आहेत. खूप मजा येईल; पण आपल्या गटात सविता आणि समीरला मात्र घ्यायचं नाही हं! सविता खूप बडबडते तर समीर सारखा खोड्या काढतो. संवाद २) म्हणून काय झालं? सविता गाणं छान म्हणते. समीर चांगले विनोद सांगतो. आपण त्यांच्याशी बोलूया. ते आपलं एकतील. आपण त्यांना वगळायचं नाही. संवाद ३) खरचं की! माझ्या लक्षात नाही आलं! आपण सगळे मिळून सहलीची तयारी करू. संवाद ४) हो, गायत्री म्हणते ते बरोबर आहे. सविताकडून आपण नवीन गाणं शिकू. समीरकडून आपण छान छान विनोद ऐकू.