कुटुंबातील मूल्ये

माहीत आहे का तुम्हांला ?

views

4:01
प्रामाणिकपणा कसा असावा. याचे उदाहरण म्हणजे आपला लाडका फलंदाज सचिन तेंडुलकर. २०११ साली भारत विरुद्ध वेस्ट इंडिज असा क्रिकेटचा सामना झाला होता. या सामन्याच्या सुरुवातीच्याच षटकात तेंडुलकरचा झेल वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने पकडला. झेल पकडल्यानंतर गोलंदाजाने पंचाकडे सचिन बाद असल्याचे अपील केले. परंतु, पंचांना वाटले की, चेंडूचा स्पर्श बॅटला झालेला नाही, म्हणून पंचांनी तेंडुलकर नाबाद असल्याचा निर्णय दिला; परंतु चेंडूचा स्पर्श आपल्या बॅटला झाला आहे हे माहीत असल्याने, पंचांनी नाबाद दिले असूनही सचिन तेंडुलकर मैदानातून पॅव्हेलियनमध्ये परतला. मुलांनो, याला प्रामाणिकपणा म्हणायचा. सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा :- जसे आपण आपल्या वैयक्तिक जीवनात प्रामाणिकपणा जपला पाहिजे, तसाच तो सार्वजनिक जीवनातही जपला पाहिजे. सार्वजनिक जीवनातही प्रामाणिकपणा असल्यास सार्वजनिक सेवा-सुविधा आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे मिळतील. उदा. बरेच प्रवासी बसने किंवा रेल्वेने प्रवास करताना तिकीट काढत नाहीत. ते विनातिकीट प्रवास करतात. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तोट्यात जाऊन अखेर पूर्णपणे बंद पडू शकते. म्हणून प्रत्येकाने प्रामाणिकपणे तिकीट काढून प्रवास केल्यास या समस्या निर्माण होणार नाहीत. काही लोक वीज कनेक्शन न घेता आकडा टाकून चोरून वीज वापरतात. यामुळे वीजमंडळ तोट्यात जाईल. म्हणून लोकांनी प्रामाणिकपणे रीतसर वीज कनेक्शन घेऊन वीज वापरणे गरजेचे आहे. आकडा टाकून वीज घेणे हे सुरक्षित नसते. रीतसर करून घेतलेली जोडणी सुरक्षित असते, हेही ध्यानात घायला हवे. नागरिकांच्यातील प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनातील कार्यक्षमता वाढविता येते. प्रामाणिकपणाचे भान व जाण समाजातील प्रत्येक नागरिकात असेल तर आपल्या सार्वजनिक जीवनातील शिस्त व कार्यक्षमता वाढविण्यास उपयुक्त ठरते. म्हणजेच सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा हा खूप महत्त्वाचा आहे.