सर्वांसाठी अन्न

शेती

views

4:03
आपण गावी गेलो असता आपल्याला शेती पाहायला मिळते. कोणाच्या शेतात तांदूळ पिकतात, कोणाच्या ज्वारी पिकते, कोणाच्या भुईमूग पिकतो तर कोणाच्या ऊस पिकतो हे तर तुम्ही पाहिलेच असेल. पण ही सर्व पिके वर्षाचे १२ महिने आपल्याला शेतात आढळतात का? नाही, काही पिके ही विशिष्ट हंगामातच पिकतात. तर काही पिकांचे उत्पादन आपल्याला वर्षभर घेता येते: उदा. भाज्या. आपल्याला वाटते तेवढे शेती करणे हे सोपे नसते. त्यासाठी खूप प्रकारची कामे करावी लागतात. शिवाय आलेल्या पिकाची साठवणूक, संरक्षण जर योग्य तऱ्हेने केले नाही, तर खूप मोठे नुकसान होते. म्हणूनच आपण आता शेतीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.