सर्वांसाठी अन्न

धान्याची साठवण

views

4:15
शेतीतील उत्पादन वाढवण्याबरोबरच शेतातून मिळालेले धान्य नीट साठवणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. आपण धान्याची साठवण नीट नाही केली तर धान्याला किडे, मुंग्या लागल्या आहेत, सगळीकडे उंदरांनी हैदोस मांडला आहे. असे होऊ नये म्हणून शेतीतील उत्पादन वाढवण्याबरोबरच शेतातून मिळालेले धान्य नीट साठवणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. ज्याप्रमाणे तुमची आई किंवा गावी आजी धान्य पोत्यांत किवा बंद डब्यांत ठेवते, कणगीत साठवून ठेवते, तसेच शेतकरी हाती आलेले धान्य उन्हात चांगले वाळवून पोत्यांत भरतात. अशी पोती घरात किंवा विक्रीनंतर गोदामांमध्ये किंवा दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात साठवली जातात. साठवलेल्या धान्याची नासाडी दोन प्रकारांनी होते. १) कीड-मुंगी, उंदीर-घुशी यांच्यामुळे धान्याची खूप नासाडी होते, तसेच २) दमट व कोंदट जागी धान्य साठवल्यास धान्याला बुरशी लागून ते खाण्यालायक राहत नाही. कीड-मुंगीचा उपद्रव होऊ नये म्हणून धान्य साठवणीच्या जागी योग्य ती औषधे फवारतात. माणसांप्रमाणे इतर सजीवसुद्धा अन्नसाठा करतात. मुंग्या, कीटक अन्नाचा संचय करतात. मधमाश्या फुलांतून मकरंद गोळा करून पोळ्यात साठवून ठेवतात. खारी झाडांच्या बिया साठवून ठेवतात. अशा प्रकारे अन्न संचय केल्यामुळे या प्राण्यांना आवश्यक त्या वेळी अन्न उपलब्ध होऊ शकते. तसेच वनस्पती त्यांना लागणाऱ्या अन्नाची निर्मिती सतत करत असतात. तरीही अन्नाचा साठा करणाऱ्या काही वनस्पती निसर्गात आढळतात. काही वनस्पती अन्नाचा साठा स्वतःच्या खोडामध्ये करतात. कांदा, लसूण, बटाटा, आले हे कंद म्हणजे त्या वनस्पतीचा खोडाचा भाग होय. रताळे, मुळा, गाजर, बीट ही त्या वनस्पतींची मुळे आहेत. ह्या भागांमध्ये या वनस्पती अन्नसाठा करतात.