भूमी उपयोजन Go Back प्रस्तावना views 2:29 भूमी उपयोजन म्हणजे जमिनीचा केला जाणारा वापर होय. मग तो आपल्या घराशी संबंधित असेल शहराशी, किंवा देशाशी. तर या प्रकारचे भूमी उपययोजन वेगवेगळ्या भागात कशा प्रकारे केले जाते, हे आपण या पाठातून पाहणार आहोत. त्यासाठी आपण एक प्रयोग करून पाहणार आहोत. निरंजनच्या घराचा नकाशा आहे. या नकाशात हे पाहा किचन म्हणजेच स्वयंपाकघर दिसते आहे. हे न्हाणीघर म्हणजे बाथरूम आहे. ही बैठकीची खोली म्हणजेच घरातील हॉल आहे. आणि ही आहे बेडरूम म्हणजे झोपण्याची खोली. पाहिलंत या घरात प्रत्येक गोष्टीची जागा ठरलेली आहे. बरं मग मला सांगा, आपणसुद्धा आपल्या घरात प्रत्येक गोष्टीची जागा ठरवतो व त्यानुसार घरात वावरतो, आपल्या घरात व्यवस्थितपणा असावा. तसेच घरातील प्रत्येक वस्तू त्या-त्या ठिकाणी मिळावी, म्हणून प्रत्येक गोष्टीची जागा ठरलेली असते. जर किचनमधील फ्रीज आपण हॉलमध्ये नेऊन ठेवला तर ते व्यवस्थित दिसणार नाही. किचनमध्ये लागणारा भाजीपाला, मसाले आणण्यासाठी आपल्याला सतत हॉलमध्ये यावे लागेल. म्हणून फ्रीज या वस्तूची जागा स्वयंपाकघरात असणेच योग्य आहे. हे एक उदाहरण आहे. अशीच गोष्ट घरातील सर्वच वस्तूंच्या बाबतीत सांगता येईल. ही जी व्यवस्था आहे, ती बदलली, वस्तूंची जागा बदलली तर काही दिवस आपला गोंधळ उडतो. आपण गोंधळून जातो. आपण पूर्वी वापरात असलेल्या ठिकाणीच जात असतो. आपल्याला नवीन व्यवस्था अंगवळणी पडण्यास बराच काळ लागतो. मुलांनो, आपण आपल्या घरात उपलब्ध असलेल्या घराची जमीन भूमी या विविध व्याव्स्थांसाठी वापरतो. प्रस्तावना करून पहा: भूमी उपयोजनाचे प्रकार नागरी भूमी उपयोजन संक्रमण प्रदेश व उपनगरे सांगा पाहू! जमिनीची मालकी व मालकी हक्क मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड)