भूमी उपयोजन Go Back भूमी उपयोजनाचे प्रकार views 4:12 भूमी उपयोजनाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात: 1)ग्रामीण भूमी उपयोजन 2) नागरी भूमी उपयोजन, ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीपूरक व्यवसायही ग्रामीण भागात आढळतात. म्हणजेच शेतीवर आधारित किंवा शेतीस साहाय्य करणारे व्यवसायही या प्रदेशात आढळतात. उदा: दुग्ध व्यवसाय हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. कारण शेतीतून निघणारे कडबा, तण, ह्या गोष्टी जनावरांना खाद्य म्हणून दिल्या जातात. जनावरांपासून मिळणारे शेणखत हे शेतीसाठी वापरले जाते. अशा प्रकारचे अनेक व्यवसाय ग्रामीण भागात आढळतात. त्यांचा ग्रामीण वस्त्यांच्या स्थानांवर परिणाम झालेला आढळतो. म्हणून अशा प्रकारच्या वस्त्या शेती क्षेत्रालगत किंवा वनक्षेत्रालगत आढळतात. नागरी भूमी उपयोजन:-मानवाने अनेक क्षेत्रांत प्रगती केल्याने उद्योगधंदे, व्यवसाय यांच्यात वाढ झाली. त्यामुळे विसाव्या शतकात नागरी वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागरी भागात शेती व शेतीपूरक व्यवसायखेरीज इतर व्यवसाय अधिक केले जातात. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे नागरी भागात लोकसंख्येची वाढ होते. लोकसंख्येच्या मानाने नागरी भागात जमीन मर्यादित असते. त्यामुळे जमिनीचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे असते. त्यामुळे नागरी भागात लोकसंख्येचे वितरण दाट असते, लोकवस्ती दाटीने वसलेली दिसून येते, नागरी वस्त्यांत भूमी उपयोजनाचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते: प्रस्तावना करून पहा: भूमी उपयोजनाचे प्रकार नागरी भूमी उपयोजन संक्रमण प्रदेश व उपनगरे सांगा पाहू! जमिनीची मालकी व मालकी हक्क मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड)