भूमी उपयोजन

जमिनीची मालकी व मालकी हक्क

views

4:54
जमिनीची मालकी व मालकी हक्क कशाप्रकारे सांगितला जातो हे आपण आता सविस्तरपणे पाहाणार आहोत. ७/१२ उतारा : मुलांनो आपण भूमी उपयोजनामध्ये जमिनीचा वापर कसा केला जातो हे पाहिले आहे. जमिनीची मालकी ही खाजगी म्हणजे एखादया व्यक्तीची किंवा सरकारी असू शकते. या जमिनी संदर्भातील नोंदणी ही सरकारच्या महसूल खात्याकडे केली जाते. महसूल खाते म्हणजे नागरिकांकडून व उद्योगांमधून मिळणारे कर उत्पन्न (Tax Income) हाताळणारे व त्याबाबतच्या ज्या काही नोंदी, मालकी हक्काच्या नोंदी, सात – बारा इ नोंदी ठेवणारा शासनाचा विभाग होय. प्रत्येक राज्याचे स्वतंत्र महसूल खाते असते. महसूल खात्याकडे नोंदणी केलेल्या जमिनीविषयी सर्व माहिती महसूल खात्याकडील ‘सातबाराचा उतारा’ या कागदपत्रात पाहता येते. सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला आपण जिथे असू तेथे मिळू शकतो. महसूल खात्याच्या एका रजिस्टरमध्ये जमीनधारकांचा मालकी हक्क, त्या जमिनीवर असलेला कर्जाचा बोजा, शेतजमीन एखादयाला विकली असेल तर तिचे हस्तांतरण, त्या जमिनीतील किती क्षेत्र पिकांखाली आहे, या सर्व गोष्टींचा समावेश सातबारा उताऱ्यात असतो. यांपैकी ‘गावचा नमुना नं ७’ आणि गावचा नमुना नं.१२ मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उताऱ्याला ‘सातबारा उतारा’ असे म्हणतात.