आरोग्य व रोग

काही संसर्गजन्य रोग

views

4:56
संसर्गजन्य रोग हे दूषित हवा, पाणी, अन्न, कीटक, यांच्याद्वारे पसरतात. म्हणून या माध्यमांद्वारे होणाऱ्या रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात. उदा: क्षयरोग. ज्या व्यक्तीला क्षयरोग होतो त्या रोग्याच्या थुंकीतून, हवेमार्फत किंवा संपर्कातून ‘मायकोबॅक्टोरीअम ट्यूबरक्युली’ नावाचे जीवाणू हवेमार्फत निरोगी माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. आणि तो रोग त्या निरोगी माणसालाही होतो. या रोगांनाच संसर्गजन्य रोग किंवा संक्रामक रोग असे म्हणतात. संक्रामक म्हणजेच संक्रमण होणे. एकापासून दुसऱ्याकडे पसरत जाणे.