आरोग्य व रोग

सद्यस्थितीतील काही महत्त्वाचे रोग

views

5:58
खड्डयात, घराच्या छपरावर अथवा इकडे तिकडे पडलेल्या टायरमध्ये तसेच अनेक ठिकाणी साचलेल्या स्वच्छ पाण्यात डास अंडी घालतात. त्याठिकाणी त्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण असल्याने ते वाढत जातात. डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. डासांच्या विविध प्रजाती वेगवेगळ्या रोगांचा प्रसार करतात. त्यापैकी ‘एडिस इजिप्ती’ या प्रकारच्या डासांमार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. हा आजार फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन 1-2 या विषाणूमुळे होतो.