आरोग्य व रोग

असंसर्गजन्य रोग

views

4:01
जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असे म्हणतात. पेशीच्या अनियंत्रित व असामान्य वाढीस कर्करोग म्हणतात. कर्करोगाच्या पेशीसमूहाला किंवा गाठीला दुर्दम्य अर्बुद म्हणतात. कॅन्सर पेशींमध्ये, उतींमध्ये आणि अवयवांमध्ये होऊ शकतो. सर्वच प्रकारच्या कॅन्सरमध्ये मुख्य गोष्ट म्हणजे अनिर्बंधपणे होणारी पेशींची वाढ होय. त्यालाच आपण कॅन्सर असे म्हणतो. कर्करोग हा फुफ्फुस, तोंड, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय, त्वचा यासारख्या अवयवांत व रक्तातही होऊ शकतो आणि कोणत्याही उतीत होऊ शकतो. कॅन्सर हा असंसर्गजन्य रोग आहे.