मराठयांच्या सत्तेचा विस्तार

बाळाजी विश्वनाथ

views

2:44
बाळाजी विश्वनाथ: ८ मे १७०७ मध्ये शाहूंची सुटका झाली. शाहू महाराजांची सुटका मुघलांच्या कैदेतून झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट याला पेशवा केले. त्यांचा पेशवेपदाचा कार्यकाल इ.स. १७१३ ते १७२० म्हणजे ७ वर्षे होता. बाळाजी विश्वनाथ भट हे मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे होते. ते मूळचे कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे होते. ते कर्तृत्ववान व अनुभवी होते. चौथाई-सरदेशमुखीच्या सनदा: मुघल बादशाहाकडून दख्खनच्या मुघलांच्या प्रदेशांतून काही ठिकाणी चौथाई तर काही ठिकाणी सरदेशमुखी वसूल करण्याच्या सनदा मिळवल्या. मुलांनो, चौथाई आणि सरदेशमुखी म्हणजे काय? तर, चौथाई म्हणजे त्या प्रदेशातून जमा होणारा जो महसूल असेल. त्याच्या एक चतुर्थांश भाग होय. आणि सरदेशमुखी म्हणजे त्या महसुलाचा एक दशांश भाग होय.