मराठयांच्या सत्तेचा विस्तार

पहिला बाजीराव

views

3:46
बाळाजीच्या मृत्यूनंतर पेशवेपदासाठी शाहूंच्या दरबारात चर्चा होऊ लागली. इ.स.१७२० मध्ये बाजीराव पेशवा झाला. त्याने पेशव्याच्या वीस वर्षांच्या कालावधीत अनेक लढाया करून मराठी सत्तेचा विस्तार केला. निजामाचा पालखेड येथे पराभव: निजामाने आपले स्वतंत्र राज्य हैदराबाद येथे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच पुण्याचा काही भाग त्याने जिंकला. त्याच्या या कारवायांमुळे बाजीरावाने निजामाला पराभूत करण्याचे ठरविले. बाजीरावाने महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पालखेड येथे निजामाचा पराभव केला. माळवा: आजच्या मध्यप्रदेश राज्यातील माळवा हा भाग मुघलांच्या ताब्यात होता. बाजीरावाने आपला भाऊ चिमाजी आप्पा यास माळव्याच्या मोहिमेवर पाठविले.