मराठयांच्या सत्तेचा विस्तार

भोपाळची लढाई

views

2:40
भोपाळची लढाई: बाजीराव आपल्यावर स्वारी करण्यासाठी येत आहे असे समजताच मुघल बादशाह अस्वस्थ झाला. भरपूर सैन्य आपल्या सोबत घेऊन तो बाजीरावावर चालून गेला. परंतु शूरवीर बाजीरावाने मध्य प्रदेशातील भोपाळ याठिकाणी त्याचा पराभव केला. पोर्तुगिजांचा पराभव: बाजीराव उत्तरेत आपला पराक्रम गाजवत होता वसई आणि ठाणे हे प्रदेश पोर्तुगिजांच्या ताब्यात होते. पोर्तुगिजांचा बंदोबस्त करण्यासाठी बाजीरावाने आपला भाऊ चिमाजीआप्पा याला पाठविले. चिमाजीसुद्धा अतिशय पराक्रमी होता. त्यानंतर १७३९ मध्ये त्याने पोर्तुगिजांच्या वसईच्या किल्ल्याला वेढा दिला. तो किल्ला खूप मजबूत होता. पोर्तुगिजांजवळ तोफा होत्या. तरीही चिमाजीने अतिशय चिकाटीने लढा देऊन पोर्तुगिजांना शरण येण्यास भाग पाडले. बाजीरावाचा मृत्यू: इराणचा बादशाह नादिरशाह याने भारतावर स्वारी केली. त्याला रोखण्यासाठी शाहू महाराजांच्या आज्ञेवरून बाजीराव मोठी फौज घेऊन उत्तरेला निघाला. तो बऱ्हाणपूरला पोहचेपर्यंत नादिरशाह प्रचंड लूट करून आपल्या देशात परत गेला होता. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून नर्मदा काठावर रावेरखेडी या ठिकाणी २८ एप्रिल १७४० रोजी बाजीरावांचा पहाटे मृत्यू झाला. आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्याने उत्तर भारतात मराठयांचा दबदबा निर्माण केला. अशा तऱ्हेने दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत मराठा सत्तेचा विस्तार करण्यासाठी बाळाजी विश्वनाथ व पहिला बाजीराव या दोन पेशव्यांनी प्रयत्न केला.