साम्राज्याची वाटचाल

नागपूरचे भोसले

views

2:12
नागपूरचे भोसले: महाराष्ट्रातील मराठी अंमलातील एक पराक्रमी मराठा घराणे म्हणून नागपूरचे भोसले घराणे ओळखले जाते. नागपूरकर भोसल्यांच्या घराण्यातील परसोजी भोसले यांना शाहू महाराजांच्या काळात वऱ्हाड व गोंडवन या प्रदेशांची सनद देण्यात आली. रघूजी भोसले हे नागपूरकर भोसल्यांपैकी सर्वात पराक्रमी व कर्तबगार पुरुष होते. त्यांचे वडील त्यांच्या लहानपणीच वारले. रघुजीने आपल्या राजधानीचे ठिकाण नागपूर या ठिकाणी हलविले. तेव्हापासून पुढे भोसल्यांचे राहण्याचे प्रमुख ठिकाण नागपूर बनले. इ.स १७५१ मध्ये नागपूरकर भोसल्यांनी ओडिशा सुभा अलीवर्दीखानाकडून जिंकून घेतला. पुढे इ.स १८०३ पर्यंत मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व होते. नागपूरकर भोसले हे एवढे पराक्रमी होते की, त्यांची धास्ती कोलकता येथील इंग्रजांनी घेतली होती. अशा तऱ्हेने भोसले (नागपूरकर) घराण्याने सुद्धा मराठी सत्तेच्या विस्तारात महत्त्वाचा वाटा उचलला होता.