साम्राज्याची वाटचाल

ग्वालियरचे शिंदे भाग 1

views

3:55
ग्वालियरचे शिंदे भाग १ : ग्वालियर हे शहर सध्याच्या मध्यप्रदेश राज्यात आहे. शिवकाळानंतर मराठ्यांचे साम्राज्य वाढविणे व पानिपतमध्ये झालेला पराभव विसरून नव्याने स्वराज्याची उभारणी करणे यात ग्वालियरच्या शिंदे घराण्याचा महत्त्वाचा वाटा आहे. यातही महादजी शिंदे यांनी दाखविलेला पराक्रम हा दैदिप्यमान होता. राणोजी शिंदे यांनी १८व्या शतकाच्या सुरुवातीस ग्वालेहरला शिंदेशाही वर्चस्व असणारे शिंद्यांचे संस्थान स्थापन केले. हे शिंदे मूळचे सातारा जिल्ह्यातल्या कण्हेरखेडचे होत. थोरल्या बाजीरावाने राणोजी शिंदेचे कर्तृत्व हेरले व त्याला उत्तरेत सरदार म्हणून नेमले. राणोजी शिंदे हे बाळाजी बाजीराव यांचे निष्ठावंत सेवक होते.