साम्राज्याची वाटचाल

ग्वालियरचे शिंदे भाग २

views

2:56
ग्वालियरचे शिंदे भाग २ : पानिपतच्या लढाईस कारणीभूत असलेला व महादजी शिंदे यांच्या दोन भावांच्या मृत्यूस जबाबदार असणारा नजीबखान याला निर्वंश करण्याची शपथ महादजी शिंदेंनी घेतली होती. नजीबखानचे वारसदार अजूनही रोहिलखंडात कारस्थाने करतच होते. नजीबखानचा नातू गुलाम कादिर याने लाल किल्ल्याचा ताबा घेऊन पैशासाठी बादशहाचा व बेगमांचा छळ केला. त्याने बादशाहचे डोळे काढले व त्याचा खजिना आपल्या ताब्यात घेतला. इ.स. १८०३ पर्यंत दिल्लीवर मराठ्यांचे नियंत्रण होते. तसेच इंग्रजांनी सुद्धा भारत जिंकला तो मराठ्यांना पराभूत केल्यानंतरच. यावरून त्यावेळी मराठ्यांचे असलेले वर्चस्व व महादजी शिंदेंची कामगिरी लक्षात येते. दिल्लीच्या कारभाराची व्यवस्था लावून महादजी शिंदे पुण्यात आले. पुण्याजवळ वानवडी येथे १२ फेब्रुवारी इ.स. १७९४ रोजी त्यांचे निधन झाले. जेथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याच ठिकाणी त्यांची आठवण म्हणून छत्री उभारली गेली.