साम्राज्याची वाटचाल

इतर काही प्रमुख सरदार

views

4:31
इतर काही प्रमुख सरदार: शिंदे, होळकर व भोसले यांच्याप्रमाणे इतरही काही प्रमुख सरदारांनी मराठ्यांच्या राज्याची सेवा केली. शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आरमाराची जबाबदारी कान्होजी आंग्रे व तुकोजी आंग्रे या पितापुत्रांनी स्वीकारली होती. तसेच आपले आरमार त्यांनी प्रबळ बनविले होते. याच आरमाराच्या जोरावर त्यांनी पोर्तुगीज, इंग्रज व सिद्दी यांसारख्या आरमारी सत्तांना धाकात ठेवले होते. तसेच स्वराज्याच्या सागरी किनारपट्टींचे रक्षण केले होते. मराठी सेनापती खंडेराव दाभाडे व त्यांचा पुत्र त्रिंबकराव यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेची पायभरणी केली. मराठी सत्तेची गुजरातेत स्थापना केली. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवली होती. त्यांची कामाची तडफ, वागण्यातील समतोलपणा यामुळे मराठी राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढविला. त्यांनी पुण्याचे वैभव वाढविले. आजारपणात १३ मार्च १८०० रोजी त्यांचा मृत्यु झाला. इंग्रजी सत्तेमुळे भारताचा पाश्चिमात्य जगाशी संबंध आला. भारतीय समाजव्यवस्थेत अनेक बदल घडून आले. जुन्या गोष्टींच्या जागी नव्या गोष्टी आल्या नवे विचार, नव्या संकल्पना जन्मास आल्या. भारतातील मध्ययुगाचा कालखंड समाप्त झाला व आधुनिक कालखंडास सुरुवात झाली.