ऋतूनिर्मिती भाग २ Go Back प्रस्तावना views 3:59 प्रस्तावना : मुलांनो, पहिल्या पाठात आपण ऋतुनिर्मितीचा पहिला भाग अभ्यासला आहे. या पाठात आपण त्या पुढील गोष्टींचा, कारणांचा अभ्यास करून त्यांची सविस्तर माहिती घेऊ. त्यासाठी आपण केलेल्या काठीच्या प्रयोगाचा वापर करणार आहोत. आणि त्याआधारे आपण काही प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. दरवर्षी साधारणपणे याच तारखांना या स्थिती येत असतात. काठीच्या प्रयोगावरून सूर्योदयाच्या स्थानात बदल झाल्याचे आपण पाहिले. आता आपण या सर्व गोष्टींची म्हणजे दिनमानात होणारा बदल व सूर्योदयाच्या स्थानात होणारे बदल यांची सविस्तर माहिती करून घेऊया. सूर्याचे भासमान भ्रमण :- मुलांनो, सूर्योदयाचे स्थान दिवसा-दिवसाने बदलत जाते. पृथ्वीवरून आपण जेव्हा सूर्योदय पाहतो, तेव्हा सूर्य वर्षभरात उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकत असल्यासारखे दिसून येते. पृथ्वी तिच्या आसापाशी २३.५ अंशांनी कललेली आहे. आणि पृथ्वीचा आस तिच्या कक्षेच्या पातळीशी ६६.५ अंशांचा कोन करतो. याच स्थितीत ती स्वत:भोवती व सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते. त्यामुळे सूर्य कधी उत्तरेकडे तर कधी दक्षिणेकडे उगवल्याचा भास होतो. त्यास ‘सूर्याचे भासमान भ्रमण’ असे म्हणतात. प्रस्तावना हे नेहमी लक्षात ठेवा संपात दिन पृथ्वीची २१ जून व २२ डिसेंबरची सूर्यसापेक्ष स्थिती: भौगोलिक स्पष्टीकरण ऋतुचक्राचा सजीवांवर होणारा परिणाम पुढील काही प्रश्नांची उत्तरे शोधूया