ऋतूनिर्मिती भाग २ Go Back संपात दिन views 4:19 संपात दिन :- पृथ्वी परिभ्रमण करीत असताना तिच्या परिभ्रमण कक्षेत दोन दिवस विषुववृत्तावर सूर्याची किरणे लंबरूप पडतात. ही स्थिती साधारणपणे २१ मार्च व २३ सप्टेंबर रोजी असते. अशा वेळी पृथ्वीचे उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात. पृथ्वीच्या या स्थितीला ‘पृथ्वीची संपात स्थिती’ म्हणतात. मुलांनो समोरील आकृतीत प्रकाशवृत्तामुळे विषुववृत्तासह सर्वच अक्षवृत्तांचे होणारे प्रकाशित व अप्रकाशित भाग दाखविले आहेत. या ठिकाणी तुम्हांला नवीन शब्द आला आहे. तो म्हणजे प्रकाशवृत्त होय. उत्तरगोलार्धात २१ मार्च ते २१ जून या कालावधीत वसंत ऋतू असतो. म्हणून उत्तर गोलार्धात २१ मार्च हा दिवस वसंत संपात असतो. तर २३ सप्टेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत उत्तर गोलार्धात शरद ऋतू असतो. म्हणून तेथे २३ सप्टेंबर हा दिवस शरद संपात असतो. दक्षिण गोलार्धात मात्र याच्या उलट ऋतू असतात. याचा अभ्यास आपण पाचवीत लीप वर्षाच्या संदर्भात केला आहे. दर ४ वर्षांनी लीप वर्ष येते. त्या वर्षी ३६६ दिवस एका वर्षात असतात. तर इतर वर्षी ३६५ दिवस असतात. प्रस्तावना हे नेहमी लक्षात ठेवा संपात दिन पृथ्वीची २१ जून व २२ डिसेंबरची सूर्यसापेक्ष स्थिती: भौगोलिक स्पष्टीकरण ऋतुचक्राचा सजीवांवर होणारा परिणाम पुढील काही प्रश्नांची उत्तरे शोधूया